श्रीरामपूर तालुक्यात नवीन 164 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 164 करोनाबाधित

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून तालुक्यात 164 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत 1250 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 109 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 144 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 17 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 7524 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 5098 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

यात श्रीरामपूर शहरात 48 तर ग्रामीण भागात 115 रुग्ण असे 163 तर 1 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 4-01 वॉर्ड नं. 5-03, वॉर्ड नं. 6-09, वॉर्ड नं. 7-18 असे 48 तर ग्रामीण भागात बेलापूर-34, ऐनतपूर-03, नरसाळी-01, उक्कलगाव-03, फत्याबाद-04, कडीत बुदुक-01, पढेगाव-01, कान्हेगाव-01, भेर्डापूर-05, कारेगाव-02, मातापूर-01, उंबरगाव-02, टाकळीभान-02, भोकर-07, उंदिरगाव-02, हरेगाव-05, माळेवाडी-03, गोवर्धन-01, महांकाळवाडगाव-02, सराला-01,निमगाव खैरी-01, गोंधवणी-01, खंडाळा-06, शिरसगाव-05, नाऊर-05, गोंडेगाव-01, माळवाडगाव-02, भामाठाण-02, खोकर-07, वडाळामहादेव-01, निपाणीवडगाव-01, अशोकनगर-01, असे 115 तर अन्य तालुक्यातील 01 रुग्ण यात पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com