COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार ४९२ रुग्णांची नोंद

COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार ४९२ रुग्णांची नोंद

संगमनेरसह 'या' तालुक्यांमध्ये द्विशतक

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शुक्रवारी नवीन करोना रुग्णापेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, तरी संगमनेर, अकोले, नगर मनपा, नेवासा आणि श्रीगोंदा तालुक्यात नवीन करोना बाधितांची संख्या ही 200 पेक्षा अधिक होती. बाधितांचे प्रमाण घटल्याने उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्याही 17 हजार 603 पर्यंत खाली असून यामुळे काही प्रमाणात प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात करोना मृत्यांच्या संख्येत 75 ची भर पडली आहे.

जिल्ह्यात काल 3 हजार 419 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची 2 लाख 24 हजार 556 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.73 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल 2 हजार 492 नवे करोना रुग्णसमोर आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 284, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 38 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 170 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 17, जामखेड 5, कर्जत 3, कोपरगाव 39, नगर ग्रामीण 46, नेवासा 50, पारनेर 1, पाथर्डी 2, राहता 15, राहुरी 16, संगमनेर 2, शेवगाव 2, श्रीगोंदा 72, श्रीरामपूर 4, कँटोन्मेंट 3, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकोले 173, जामखेड 14, कर्जत 08, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 69, नेवासा 87, पारनेर 38, पाथर्डी 20, राहाता 78, राहुरी 15, संगमनेर 197, शेवगाव 44, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 75, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 1 हजार 170 जण बाधित आढळुन आले. मनपा 71, अकोले 97, जामखेड 16, कर्जत 30, कोपरगाव 62, नगर ग्रामीण 69, नेवासा 90, पारनेर 147, पाथर्डी 97, राहाता 60, राहुरी 74, संगमनेर 95, शेवगाव 45, श्रीगोंदा 139, श्रीरामपूर 65 आणि इतर जिल्हा 13 अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरूवारी करोना मृतांची संख्या 2 हजार 575 होती. त्यात 75 ने वाढ झाल्याने आतापर्यंत करोना बळींची संख्या आता 2 हजार 650 झाली आहे.

संगमनेर 294, अकोले 270, नगर मनपा 240, नेवासा 227, श्रीगोंदा 224, पारनेर 186, नगर ग्रामीण 184, राहाता 153, श्रीरामपूर 144, कोपरगाव 136, पाथर्डी 119, राहुरी 105, शेवगाव 91, कर्जत 41, जामखेड 35, अन्य जिल्हा 34, भिंगार 6, अन्य राज्य 2, लष्कर रुग्णालय 1 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com