COVID19 : जिल्ह्यात नव्या करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

COVID19 : जिल्ह्यात नव्या करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

अहमदनगर l Ahmednagar

जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 3 हजार 963 करोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे करोना बाधितांची संख्या आता 1 लाख 90 हजारांच्या जवळ पोहचली आहे. जिल्ह्यात काल 36 करोना रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असून उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 23 हजार 751 झाली आहे.

जिल्ह्यात काल 2 हजार 566 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 63 हजार 252 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.30 टक्के झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 962, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2 हजार 160 आणि अँटीजेन चाचणीत 841 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 48, अकोले 1, जामखेड 152, कर्जत 3, कोपरगाव 30, नगर ग्रामीण 81, नेवासा 73, पारनेर 55, पाथर्डी 71, राहता 67, राहुरी 100, संगमनेर 61, शेवगाव 131, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 42, मिलिटरी हॉस्पिटल 7 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 492, अकोले 44, जामखेड 18, कर्जत 15, कोपरगाव 91, नगर ग्रामीण 255, नेवासा 99, पारनेर 126, पाथर्डी 33, राहाता 198, राहुरी 88, संगमनेर 201, शेवगाव 77, श्रीगोंदा 52, श्रीरामपूर 254, कँटोन्मेंट बोर्ड 25 आणि इतर जिल्हा 87 आणि इतर राज्य 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 841 जण बाधित आढळुन आले. मनपा 83, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 9, कोपरगाव 124, नगर ग्रामीण 78, नेवासा 63, पारनेर 128, पाथर्डी 15, राहाता 54, राहुरी 129, संगमनेर 26, शेवगाव 9, श्रीगोंदा 80, श्रीरामपूर 21, कँटोन्मेंट 3 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी करोना मृतांची संख्या 2 हजार 128 होती. यात 36ची वाढ होवून करोना बळींची संख्या आता 2 हजार 164 झाली आहे.

नगर मनपा 622, नगर ग्रामीण 414, राहाता 319, राहुरी 317, पारनेर 309, श्रीरामपूर 297, संगमनेर 288, कोपरगाव 245, नेवासा 335, शेवगाव 217, जामखेड 174, श्रीगोंदा 147, पाथर्डी 119, अन्य जिल्हा 101, भिंगार 70, अकोले 50, कर्जत 27, लष्कर 7 अन्य राज्य 5 असे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com