पारनेर तालुक्यातील 'या' 21 गावात कडक लॉकडाऊन

नियम मोडणार्‍यावर थेट गुन्हे दाखल होणार
पारनेर तालुक्यातील 'या' 21 गावात कडक लॉकडाऊन

पारनेर (प्रतिनिधी)

करोना रुग्ण (Covid19 Patient) संख्या वाढत असलेल्या पारनेर (Parner) तालुक्यातील गावामध्ये प्रभावी स्वरूपात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी निर्देश दिले आहेत.

पारनेर तालुक्यातील 'या' 21 गावात कडक लॉकडाऊन
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

त्यानुसार पारनेर तालुक्यातील 21 गावामध्ये तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांनी भेट देत करोना नियमावलीचे (Corona rules) काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच काही ठिकाणी निर्बंध मोडणार्‍या व्यवसायिक दुकानदार नागरिकांवर कारवाई केली असून नियम मोडणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार देवेरे यांनी दिला आहे.

तालुक्यात काही गावामध्ये वाढता करोनाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्‍वर, वडगावगुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या 21 गावात कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार देवरे यांनी दिले आहेत. या गावामध्ये 100 टक्के करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. करोना रुग्ण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 22 जुलैपर्यंत तहसिलदार देवरे यांनी ही गावे प्रतिबंधात्मक झोन घोषित केली आहेत.

टाकळीढोकेश्‍वर मध्यवर्ती बाजारपेठेचा 100 मीटर परिसर प्रतिबंधात्मक झोन (Restrictive zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी जलसेन हे गाव देखील प्रतिबंधात्मक गाव म्हणून घोषित करण्यात आली आहे. टाकळी ढोकेश्‍वर येथील ओम ज्वेलर्स, जवळे येथील विठ्ठल हार्डवेअर, निघोज येथील कोहिनूर सुपर मार्केट हे दुकान सील करण्यात आले आहेत. गेली 15 दिवसांपासून निघोज व परिसरातील करोना रुण्गांची संख्या वाढत आहे. कितीही निर्बंध असली तरी निघोज ग्रामस्थ ऐकत नाहीत. तालुक्यातील सर्व गावे एकीकडे व निघोज गाव दूसरीकडे असा विषय झाला असून ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी मोठी आहे. नियम मोडणार्‍यांची गय नाही, असा दम तहसिलदार देवरे यांनी दिला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागातील लोक आपल्याकडे येणार नाहीत, याची दक्षता घेतली. आता मात्र निघोजचे लोक नगर, पुणे, मुंबई येथे गेल्यावर त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते, असा प्रकार होत असल्याने निघोज व परिसरातील लोकांनी सावध राहाण्याची गरज आहे. यासाठी 22 पर्यंत अधिकारी निघोज येथे थांबणार असून जोपर्यंत करोना हद्दपार होत नाही. तो पर्यंत निघोज व परिसरातील कडक निर्बंध सुरुच राहणार असल्याची माहिती तहसीलदार देवेरे यांनी दिली. गाव व परिसरात दशक्रिया, विधी, लग्न, पूजा व इतर कार्यक्रम यासाठी मोठी गर्दी होत असते. शेत मजूरांना व महिला मजूरांना छोट्याशा वाहनांमधून नेण्या आणण्याचे काम होत असते. तसेच कंपनीत जाणारे कर्मचारी, वाहक, चालक हे शहरात मोठ्या संख्येने जातात व येतात त्यांची राहाण्याची व्यवस्था स्वतंत्र करण्याची गरज आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत निघोज ग्रामस्थांनी चांगले काम केले. बाहेरील मजूरांची राहाण्याची चांगली व्यवस्था केली. आता मात्र, आपल्याला काहीच होणार नाही. या आविर्भावात निघोज व परिसरातील जनतेने राहू नये. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार देवरे यांनी केले आहे.

संबंधित गावांमध्ये फक्त मेडिकल व कृषी केंद्र, फळे, भाजीपाला, दुध विक्री सुरू राहणहार असून तालुक्यात लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभासाठी पूर्व परवानगी सक्तीची करण्यात आली असून बाहेरुन आलेले पाहुणे 7 दिवस शाळेत वेगळे ठेवायचे. गावातील ड्रायव्हर शाळेत वेगळे राहतील. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी मुख्यालय सोडणार नाहीत. वार्डनिहाय प्रत्येक गावात 100 टक्के कुटुंब तपासणी व टेस्टींग करायचे आहे. रुग्ण सक्तीने कोविड केअर सेंटरला आणायचे आहेत. विनामास्क फिरणार्‍या लोकांचे व चौकात पारावर विनाकारण बसणारे फिरणारे यांचे फोटो काढून त्यांचेवर 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोविड सुसंगत वर्तन नसलेस आता यापुढे समज न देता सरळ गुन्हे दाखल करणार आहोत.

ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com