बंद शाळा पतंगोत्सवाच्या पथ्यावर

शाळा बंद होताच विद्यार्थ्यांकडून पतंग, मांजा खरेदीसाठी गर्दी
बंद शाळा पतंगोत्सवाच्या पथ्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनामुळे अन्य उत्सव आणि बाजार चिंतेत असला तरी पतंगोत्सवातील उत्साह अधिकच दिसून येत आहे.

राज्य सरकारने निर्बंध जारी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच पतंगोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी पतंग, मांजा खरेदीसाठी विद्यार्थी व युवकांची पतंगबाजारांत गर्दी दिसून येत आहे.

बंद शाळा पतंगोत्सवाच्या पथ्यावर
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

दोन दिवसांनी मकरसंक्रांतीचा सण साजरा होईल. यानिमित्त अनेकांकडून पतंगोत्सवाची तयारी सुरू होती. मात्र मात्र शाळा-महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद होताच या तयारीला अधिकच वेग आला आहे. पतंग आणि मांजाचा बाजार तेजीत आहे.

शहरातील झेंडीगेट व बागडपट्टी भागात ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने थाटली गेली आहे. विविध रंग, आकारात कागदी व प्लॅस्टिकचे आकर्षक पतंग युवकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बंद शाळा पतंगोत्सवाच्या पथ्यावर
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

नायलॉन मांजावर प्रतिबंध आल्याने विक्रेत्यांनाही बरेली व पांडा मांजाला प्राधान्य दिले आहे. तयार मांजाची चक्री दीडशे ते हजार रुपयापर्यंत विक्री होत आहे. पतंग देखील पाच ते तीस रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

मकरसंक्रांतीला बालकांपासून वयस्कांपर्यंत प्रत्येक जण संक्रांतीला पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. शहरात पतंगाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे तालुकास्तरावरील नागरिकही पतंग, माजा खरेदीसाठी शहरात येण्यास पसंती देत आहेत.

रोहिदास चिपोळे, पतंग विक्रेते

बंद शाळा पतंगोत्सवाच्या पथ्यावर
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com