COVID19 : जिल्ह्यात आज चार हजार ४७५ रुग्णांची नोंद

कुठे, किती नवे रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यात आज चार हजार ४७५ रुग्णांची नोंद

अहमदनगर l Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवारी करोना बाधितांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. यामुळे जिल्ह्यात करोना संसर्गाचा विस्फोट झाला असल्याचे दिसत असून एका दिवसात 4 हजार 475 करोनाचे नवे रुग्ण सापडल्याने उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 25 हजारांच्या पुढे गेली आहे. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची वाटचाल आता वेगाने दोन लाखांच्या दिशेने होत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात काल 3 हजार 103 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 66 हजार 355 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 85.91 टक्के आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 25 हजार 114 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 1 हजार 53, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2 हजार 385 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 37 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 59, अकोले 135, जामखेड 115, कर्जत 101, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 41, नेवासा 11, पारनेर 46, पाथर्डी 70, राहता 27, राहुरी 07, संगमनेर 149, शेवगाव 120, श्रीगोंदा 102, श्रीरामपूर 40, कँटोन्मेंट बोर्ड 9, मिलिटरी हॉस्पिटल 9 आणि इतर जिल्हा 9 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 576, अकोले 61, जामखेड 12, कर्जत 22, कोपरगाव 111, नगर ग्रामीण 366, नेवासा 124, पारनेर 110, पाथर्डी 34, राहाता 218, राहुरी 96, संगमनेर 216, शेवगाव 27, श्रीगोंदा 52, श्रीरामपूर 230, कँटोन्मेंट बोर्ड 30 आणि इतर जिल्हा 90 आणि इतर राज्य 10 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 1 हजार 37 जण बाधित आढळुन आले. मनपा 131, अकोले 8, जामखेड 03, कर्जत 121, कोपरगाव 125, नगर ग्रामीण 61, नेवासा 21, पारनेर 130, पाथर्डी 40, राहाता 36, राहुरी 116, संगमनेर 21, शेवगाव 05, श्रीगोंदा 146, श्रीरामपूर 13, कँटोन्मेंट 53 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर मनपा 766, नगर ग्रामीण 468, संगमनेर 386, श्रीगोंदा 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासा 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130, अन्य जिल्हा 106, भिंगार 92, अन्य राज्य 11, लष्कर रुग्णालय 9 असे आहेत.

26 हजार लस आली

जिल्ह्यात 28 एप्रिलनंतर बुधवारी पहाटे 26 हजार करोना प्रतिबंधक लसचा पुरवठा झाला आहे. यात 8 हजार लसही को-व्हॉक्सीन कंपनीची असून ही लस नगर शहरातील 18 ते 44 वयोगटातील नोंदणीकृत लोकांसाठी आहे. उर्वरित लस ही कोव्हीलशीड कंपनीची असून ती लस 45 वर्षापुढील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाठविण्यात आली. जिल्ह्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र, यावेळी मोठ्या संख्याने नागरिकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी गोंधळ झाला. लसचा तुटवडा असल्याने आता नागरिक हैराण झाले असून 1 मे पासून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सशुल्क लसीकरण थांबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com