राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की

तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की

राहाता (वार्ताहर)

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री ९ नंतर संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी गस्त घालत असताना दुकान बंद करा, गर्दी करू नका असे म्हटल्याचा राग आल्याने तीन व्यक्तींकडून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना धक्काबुक्की झाली. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

राहाता पोलिसात मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राज्यात करोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रादुर्भाव वाढत चालला असून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री ९ नंतर संचारबंदी नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी शहरातील दुकाने बंद ठेवणे बंधनकारक असून पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमू नये, असा आदेश जारी केला असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजे दरम्यान राहाता नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक साठे, मोहन गाडेकर, आनंद लाठे यांना बरोबर घेऊन शहरात नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून गस्त घालीत असताना राहाता ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेल्या हर्षल मेन्स पार्लर येथे दुकानमध्ये काही व्यक्ती तसेच दुकानाबाहेर काही व्यक्ती असे पाच पेक्षा अधिक व्यक्ती त्या ठिकाणी दिसल्याने मी त्यांना राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवले व येथे गर्दी करू नका तसेच हर्षल मेन्स पार्लर बंद करण्यास सांगितले असता.

राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

सदर व्यक्तींना माझ्या सांगण्याचा राग आल्याने ते मला म्हणाले, आम्ही राहाता गावातील राहणार आहोत, तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला दम देतो का ? आम्ही इथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणाल्याने मी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी त्यांना समजून सांगत असताना त्यातीळ पोपट रघुनाथ जाधव, निसार सय्यद उर्फ राज्जु भाई, सिद्धार्थ वाघमारे या तीन व्यक्तींनी गोंधळ घालून मला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

तुम्ही जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करीत आहात, असे सांगूननही त्यांनी माझे काही एक ऐकून घेतली नाही. सदर घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत असल्याचे पाहून तेथील जन्मलेल्या व्यक्तींनी तिथून पळ काढला.

राहाता येथे मुख्याधिकारी चव्हाण यांना धक्काबुक्की
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

कोविड प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन करून व मास्क घातले नसल्याने सदर दुकान बंद करून सील केले असून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोपट रघुनाथ जाधव, निसार सय्यद उर्फ राज्जु भाई, सिद्धार्थ वाघमारे या तीन व्यक्तींविरुद्ध राहाता पोलिसात भादंवि कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला केला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com