अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर रविवारी कायम होता. नव्याने 1 हजार 617 करोना रुग्ण समोर आले असून

यामुळे उपचार घेणार्या रुग्णांची संख्या धोकादायक पातळीकडे सरकली आहे. दरम्यान राहुरी तालुक्यात करोनाचे शतक झाल्याने राहुरीकरांची धास्ती वाढली असून नगर शहर आणि ग्रामीण, राहाता आणि संगमनेरमधील करोनाचा उद्रेक कालही कायम होता.

रविवारी जिल्ह्यात 1 हजार 347 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्या 91 हजार 48 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमााण हे 89.57 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 619 आणि अँटीजेन चाचणीत 540 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 285, अकोले 11, कर्जत 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 31, नेवासा 3, पारनेर 16, पाथर्डी 3, राहाता 26, राहुरी 8, संगमनेर 4, शेवगाव 5, श्रीरामपूर 28, कॅन्टोन्मेंट बोर्ड 35 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 141, अकोले 22, जामखेड 5, कर्जत 3, कोपरगाव 62, नगर ग्रामीण 17, नेवासा 15, पारनेर 7, पाथर्डी 4, राहाता 127, राहुरी 27, संगमनेर 94, शेवगाव 4, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 53, कँटोन्मेंट बोर्ड 6, इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 540 जण बाधित आढळुन आले.

मनपा 65, अकोले 6, जामखेड 3, कर्जत 92, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 50, नेवासा 33, पारनेर 8, पाथर्डी 45, राहाता 37, राहुरी 91, शेवगाव 18, श्रीगोंदा 33, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट बोर्ड 20 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1 लाख 1 हजार 654 झाली आहे.

नगर मनपा 491, राहाता 190, राहुरी 126, श्रीरामपूर 105, नगर ग्रामीण 98, संगमनेर 98, कर्जत 97, कोपरगाव 77, भिंगार 61, पाथर्डी 52, नेवासा 51, श्रीगोंदा 45, अकोले 39, पारनेर 31, शेवगाव 27, अन्य जिल्हा 20, जामखेड 8, अन्य राज्य 1 असे आहेत.