COVID19 : जिल्ह्यात आजही दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण

COVID19 : जिल्ह्यात आजही दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात मंगळवारी नव्याने 2 हजार 191 नवे करोना बाधित आढळून आले आहेत. यात अचानक श्रीरामपूर तालुका टॉपवर आला असून मृतांच्या संख्येतही 33 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या 15 हजार 402 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात काल 2 हजार 198 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 34 हजार 665 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 92.76 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 565, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 811 आणि अँटीजेन चाचणीत 815 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 2, अकोले 2, जामखेड 62, कर्जत 5, कोपरगाव 42, नगर ग्रामीण 75, नेवासा 74, पारनेर 43, पाथर्डी 66, राहता 28, राहुरी 3, संगमनेर 65, शेवगाव 67, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 2, कॅन्टोन्मेंट 3, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 81, अकोले 3, जामखेड 4, कर्जत 13, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 49, नेवासा 37, पारनेर 26, पाथर्डी 82, राहाता 94, राहुरी 36, संगमनेर 19, शेवगाव 30, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 279, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 10 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 815 जण बाधित आढळुन आले.

मनपा 25, अकोले 39, जामखेड 36, कर्जत 39, कोपरगाव 50, नगर ग्रामीण 31, नेवासा 48, पारनेर 88, पाथर्डी 71, राहाता 36, राहुरी 39, संगमनेर 87, शेवगाव 54, श्रीगोंदा 126, श्रीरामपूर 39, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी करोनामुळे मृतांची संख्या 2 हजार 870 होती. त्यात 33 वाढ होवून करोना बळींची संख्या आता 2 हजार 903 झाली आहे.

श्रीरामपूर 320, पाथर्डी 219, संगमनेर 171, नेवासा 169, राहाता 158, पारनेर 157, श्रीगोंदा 156, नगर ग्रामीण 155, शेवगाव 151, कोपरगाव 121, नगर मनपा 108, जामखेड 102, राहुरी 78, कर्जत 57, अकोले 44, अन्य जिल्हा 26, भिंगार 7, लष्कर रुग्णालय 1 अन्य राज्य 1 असे आहेत.

किशोरवयीन 281 रुग्ण वाढले

किशोरवयीन मुलांनाही आता करोना घेरू लागला आहे. काल नगर जिल्ह्यात 1 ते 10 वर्षीय 76 तर 11 ते 18 वर्षीय 205 मुलांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com