कोविड सेंटरला लाखमोलाची मदत

नोकरीनिमित्त बाहेर राहणार्‍या तिसगावकरांचा उपक्रम
कोविड सेंटरला लाखमोलाची मदत

करंजी (वार्ताहर)

‘आम्ही तिसगावकर’ या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळपास एक लाख रुपयांची मदत नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या व आपल्या गावासाठी काही तरी करण्याची उर्मी असलेल्या तरुणांनी मदतीचा हात करत पुढे केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या रक्कमेचा धनादेश ग्रुपमधील सदस्यांच्यावतीने प्रा. मुक्तार शेख यांनी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्याकडे सुपूर्त केला. करोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असतांना तिसगाव आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सरपंच लवांडे यांनी पुढाकार घेवून पाथर्डीनंतर तालुक्यातले पहिले कोविड सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरू केले.

कोविड सेंटरला लाखमोलाची मदत
लसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक

रूग्णांसाठी सुरू केलेले हे कोविड सेंटर चालवण्याचे मोठे आव्हान तिसगाव ग्रामपंचायतीने यशस्वीपणे पेलवले असून त्यासाठी विविध समाज घटकाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले असले तरी आम्ही तिसगावकर ग्रुपने केलेली मदत देखील लाखमोलाची ठरल्याचे काशिनाथ लवांडे म्हणाले.

यावेळी प्रा.शामराव लवांडे, आदिनाथ घोडके, मियाँभाई शेख, सीताराम कोलते, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, वसंत गारूडकर, नारायण लवांडे, सुनील भडके, अनिल गांधी, अनिल आठरे, रामदास शिंदे, सुचेता मैड, पत्रकार मनोज सातपुते यांचेसह सहकार्य करणार्‍या सदस्याचे गावच्यावतीने आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इलियास शेख, भाऊसाहेब लवांडे, नाथा वाबळे, पापा तांबोळी, रफीक शेख, हमीद शेख, कल्याण लवांडे, सुनिल लवांडे, संतोष बोरूडे, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. होडशीळ व कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती अकोलकर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com