Cornavirus : जिल्ह्यात बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली !

कुठे, किती नवे रुग्ण?
Cornavirus : जिल्ह्यात बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली !

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यासाठी रविवार काहीसा दिलासादायक ठरला आहे. काल बाधित रुग्णांच्या तुलनेत करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात 3 हजार 553 करोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तर 3 हजार 493 नवे करोना रुग्ण समोर आले आहेत. दुसरीकडे रविवारी 39 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 491 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 84.32 टक्के इतके आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 23 हजार 203 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 850, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 56 आणि अँटीजेन चाचणीत 1587 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 174, अकोले 2, जामखेड 120, कर्जत 102, कोपरगाव 77, नगर ग्रामीण 33, नेवासा 15, पारनेर 34, पाथर्डी 48, राहता 73, राहुरी 4, संगमनेर 2, शेवगाव 45, श्रीगोंदा 51, श्रीरामपूर 33, कँटोन्मेंट बोर्ड 34 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 468, अकोले 4, जामखेड 7, कर्जत 14, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 126, नेवासा 38, पारनेर 46, पाथर्डी 9, राहाता 151, राहुरी 20, संगमनेर 36, शेवगाव 6, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 34, कँटोन्मेंट बोर्ड 29 आणि इतर जिल्हा 23 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 587 जण बाधित आढळून आले. मनपा 273, अकोले 35, जामखेड 27, कर्जत 136, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 191, नेवासा 87, पारनेर 80, पाथर्डी 41, राहाता 177, राहुरी 130, संगमनेर 83, शेवगाव 157 श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 46, कॅन्टोन्मेंट बोर्ड 33 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर मनपा 915, राहाता 401, नगर ग्रामीण 350, कर्जत 252, शेवगाव 208, पारनेर 160, जामखेड 154, राहुरी 154, नेवासा 140, कोपरगाव 131, संगमनेर 121, श्रीगोंदा 115, श्रीरामपुर 113, पाथर्डी 98, भिंगार 95, अन्य जिल्हा 43, अकोले 41, अन्य राज्य 1 आणि लष्कर रुग्णालय 0 असे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com