COVID19 : काळजी घ्या! नगर जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद

COVID19 : काळजी घ्या! नगर जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर | प्रतिनिधी

करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या (corona second wave) वेळी राज्यासह देश पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या नगर (ahmednagar corona update) जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसह उपचाराधीन रुग्णसंख्याही (covid19 active patient in ahmednagar) सतत वाढत आहे.

करोना अपडेट
Happy Birthday Hima Das : वाचा, 'हिमा दास'च्या जिद्दीची कहाणी!

आज जिल्ह्यात २७२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ५४, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत १५८ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ६०रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

मनपा - ६८

राहता - ४६

कोपरगाव - २४

नगर ग्रामीण - १७

अकोले - १५

श्रीरामपूर - १५

राहुरी - १२

पाथर्डी - ११

संगमनेर - १०

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०९

शेवगाव - ०९

श्रीगोंदा - ०८

मिलिटरी हॉस्पिटल - ०७

इतर जिल्हा - ०७

पारनेर - ०६

जामखेड -०२

कर्जत - ०२

नेवासा - ०२

इतर राज्य - ०२

ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडला

जिल्ह्यात ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, संबंधीत रुग्ण महिलेचा ओमिक्रॉनचा अहवाल येण्यापूर्वी तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण श्रीरामपूरमधे आढळला त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील एका गावात येथे देखील एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. करोना संसर्ग सुरू झाल्यामुळे मुंबई येथे राहत असलेले एक कुटुंब दोन वर्षापासून त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील मूळगावी येवून राहत आहे. कुटुंबातील तीन व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिलेचा पुणे येथून आलेल्या रिपोर्टमध्ये ती ओमिक्रॉन बाधित असल्याचे समोर आले. या रिपोर्टनूसार आणखी ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या समोर येणार आहे. दरम्यान, कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसताना ओमिक्रॉनचे निदान झाल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com