<p>श्रीरामपूर (प्रतिनिधी)</p><p>करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु </p>.<p>काय सुरु आणि काय बंद याबाबत संभ्रमात असणार्या व्यापार्यांनी काल पोलीस स्टेशन गाठत तेथे असलेल्या प्रांताधिकार्यांची भेट घेतली. व्यापार्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी प्रांताधिकार्यांनी आजपासून शहरात कडक अंमलबजावणी करणार असल्याचे व्यापार्यांना सांगितले.</p>.<p>25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती. शहरात नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मात्र बेलापूर रोड पुलावर तसेच चौका चौकात गर्दीच दिसून येत होती. भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी होती. प्रशासनाने काही ठिकाणी दुकाने सील करण्याची कारवाई सुरु केल्याने व्यापारी संतप्त झाले होते. रेल्वेच्या पलीकडे आणि अलिकडे असे भेदभाव केला जात आहे. नेहमीच पालिकेचे कर्मचारी अधिकारी तसेच पोलीस प्रशासन रेल्वेच्या अलिकडच्या बाजार पेठेतील व्यापार्यांवर अन्याय करत आले आहेत. नेहमीच अलिकडेच कारवाई केली जाते. रेल्वेच्या पलिकडे केली जात नाही असा दुजाभाव हे अधिकारी का करतात? याबाबत प्रांताधिकार्यांना प्रश्न उपस्थित केला. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, आजपासून शहरातील सर्वच भागात कडक निर्बंध लावले जाणार असून हे नियमांची अंमलबजावणी करण्यात येवून कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.</p>