झेडपी, पंचायत समितीत प्रवेशासाठी मास्क सक्ती, ५०० रुपयांचा दंड

झेडपी, पंचायत समितीत प्रवेशासाठी मास्क सक्ती, ५०० रुपयांचा दंड
मास्क

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील करोनाचा प्रादूर्भाव संपण्याचे नाव घेण्यास तयार नाही. त्यातच आता ओमिक्रॉनने नगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

मास्क
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कार्यालयात योग्य मास्कची सक्ती करण्यात आली आहे. विना मास्क येणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मास्क
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आणि तालुका पातळीवर असणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयात विविध कामे आणि प्रश्न घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते. यातील अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या निदर्शनास आले.

मास्क
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयासह जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयात विना मास्क असणाऱ्यांना बंदी केली असून आले तर त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यालयात आतापर्यंत १० कर्मचाऱ्यांना विना मास्कमुळे दंड करण्यात आला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

मास्क
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com