बेलपिंपळगाव आजपासून 5 दिवस बंद

का घेतला निर्णय?
बेलपिंपळगाव आजपासून 5 दिवस बंद

बेलपिंपळगाव (वार्ताहर)-

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून करोना प्रादुर्भावर प्रतिबंध घालण्यासाठी गावातील करोना नियंत्रण समितीने करोनाची साखळी तोडण्याकरीता आज शनिवार दि. 28 ऑगस्टपासून पाच दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात गावातील दवाखाना, मेडिकल, दुग्धव्यवसाय वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. गावातील आठवडे बाजार, हॉटेल, किराणा, कापड दुकान आदींसह सर्व व्यवसाय-दुकाने बंद असतील तसेच गावात इतर विनाकाम व विना मास्क फिरणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून आर्थिक दंड देखील करण्यात येणार आहे.

जर या काळात दुकान उघडे सापडले तर 1100 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्यांदा दुकान उघडे आढळून आले तर पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार रेणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी सहकार्य करावे. गावातील सर्व धार्मिक स्थळे देखील या काळात बंद असणार आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अनेक रुग्ण गावात सापडत असल्याने नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सर्वांनी नियमांचे पालन करुन करोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन गावातील करोना समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com