अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात बुधवारी करोना संसर्गाने बाधितांपेक्षा उपचारातून बरे होण्याचे प्रमाण अधिक राहिले. 1 हजार 680 जणांना करोना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

बरे होण्याचे प्रमाण हे बाधितांपेक्षा जास्त होते. बाधितांची संख्या 1 हजार 652 राहिली. त्याचबरोबर उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे वाढत्या करोना संसर्गातही नगरकरांना दिलासा मिळाला.

सध्या जिल्ह्यात 10 हजार 738 जणांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 7 हजार 168 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. त्यातील 95 हजार 175 जण करोना उपचारानंतर बरे झाले आहे. करोना उपचारादरम्यान आतापर्यंत 1 हजार 255 जणांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत 492 आणि अँटीजेन चाचणीत 702 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 141, अकोले 13, जामखेड 16, कर्जत 11, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 22, नेवासा 3, पारनेर 7, पाथर्डी 24, राहता 27, राहुरी 11, संगमनेर 53, शेवगाव 32, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 9, कँटोन्मेंट बोर्ड 44, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेनुसार मनपा 155, अकोले 6, जामखेड 1, कर्जत 4, कोपरगाव 56, नगर ग्रामीण 35, नेवासा 4, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 88, राहुरी 20, संगमनेर 31, शेवगाव 4, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 57, कँटोन्मेंट बोर्ड 3, इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 702 जण बाधित आढळुन आले. मनपा 66, अकोले 49, जामखेड 29, कर्जत 151, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 77, नेवासा 58, पारनेर 15, पाथर्डी 63, राहाता 31, राहुरी 66, शेवगाव 48, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.