1 हजार 239 विद्यार्थ्यांनी करोनात गमावले छत्र

शिक्षण समिती : पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्याचा ठराव
1 हजार 239 विद्यार्थ्यांनी करोनात गमावले छत्र
COVID19

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत ऐकट्या जिल्हा परिषद शाळेतील पालक (छत्र) गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 329 आहे.

यावरून करोनात माध्यमिक शाळा, अन्य व्यवस्थापन आणि ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेजमधील किती विद्यार्थी अनाथ झालेे असतील याचा अंदाज येतो. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने किमान जिल्हा परिषदेच्या छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासोबतच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषद प्राथकमिक शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी पारपडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर जिल्ह्यात करोनात बळी गेल्यामुळे जे विद्यार्थी अडचणीत सापडलेले आहेत, त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजुला जावून न देता, त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा कसा लाभ मिळवून देता येईल, या विषयावर चर्चा झाली. दरम्यान, केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारण्यात आली. त्यावर प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 329 असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासोबत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर सदस्य राजेश परजणे, जालींदर वाकचौरे यांची चर्चा केली. तसेच पेसा (आदिवासी भाग) तून जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी स्वतंत्र नामांकन करण्याची सुचना सदस्य वाकचौरे यांनी केली. शिक्षण समितीच्या सभेला सदस्य मिलींद कानवडे, गणेश शेळके, उज्वला ठुबे, विमल आगवण, शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी रामदास हराळ उपस्थित होते.

अशी आहे, पालक गमावलेले विद्यार्थी

अकोले 59, कर्जत 74, कोपरगाव 34, जामखेड 34, नगर 153, नेवासा 124, पाथर्डी 42, पारनेर 84, राहाता 160, राहुरी 126, शेवगाव 19, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 52, संगमनेर 195, मनपा 143 एकूण 1 हजार 329 असे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com