संगमनेर पहिला क्रमांक सोडेना

नगर जिल्ह्यात आज वाढले....
संगमनेर पहिला क्रमांक सोडेना
Corona

अहमदनगर | ahmednagar -

जिल्ह्यात करोना covid 19 रूग्णवाढीचा वेग 800 च्या घरात स्थिरावला आहे. बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 857 बाधितांची भर पडली आहे. नगर शहर ahmednagar city व भिंगार bhingar छावणीक्षेत्रात एकूण 28 रूग्ण वाढले आहेत. तर संगमनेर sangamner तालुक्यातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची दैनंदिन संख्या 700 ते 900 च्या दरम्यान आहे. पुणे pune वगळता बाजूच्या अन्य जिल्ह्यांपेक्षा ही संख्या अधिक आहे. करोनावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे District Administration प्रयत्न सुरू असताना ग्रामीण भागात फैलावलेला करोना अटोक्यात आलेला नाही.

बुधवारी सकाळी आलेल्या अहवालांनुसार संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 216 रूग्ण आढळले. त्यापाठोपाठ पारनेर 102, श्रीगोंदा 75, अकोले 71, शेवगाव 62, नेवासा 59, कर्जत 49, पाथर्डी 45, राहुरी 29, नगर ग्रामीण 26, राहाता 24, जामखेड 22, कोपरगाव 21, श्रीरामपूर 21 अशी या तालुक्यांतील बाधितांची संख्या आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com