कोव्हिड नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी पॉझिटिव्ह

आयकर खात्याच्या ऑफिसमध्ये पाच पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोव्हिड नियंत्रण कक्षातील महिला कर्मचार्‍याचा रिपोर्टही सोमवारी पॉझिटिव्ह निघाला आहे. रविवारी आयकर खात्याच्या ऑफिसमधील पाच जणांना करोनाची बाधा झाली.

नगर शहरातील करोना नियंत्रण कक्ष जुन्या महापालिकेत असून तेथून करोना आकडेवारी अपडेट केली जाते. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता या महिलेच्या संपर्कातील कर्मचार्‍यांची टेस्टींग केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान काल रविवारी इन्कम टॅक्स ऑफिसमधील पाच जणांना करोनाची लागण झाली. आज मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नगर शहरातील करोनाग्रस्तांची नोंद घेण्यासाठी महापालिकेने जुन्या महापालिका कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केला आहे. तेथेही आता करोना शिरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com