'या' कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिले जातात योगसाधनेचे धडे

'या' कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिले जातात योगसाधनेचे धडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भविष्यात निर्माण होणार्‍या परिस्थितीचा अंदाज घेवून आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे 500 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केल्यामुळे बाधित रुग्णांना दिलासा मिळाला.

बांधित रुग्णांना येथे मोफत उपचाराबरोबरच योगसाधनेचे धडे जात आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रोज बाधित रुग्णांचा आकडा जरी मोठा असला तरी बाधित रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटर हक्काचे आरोग्य केंद्र बनले आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचे रौद्र रूप पाहता आमदार आशुतोष काळे यांनी वेळीच पाऊल उचलून 500 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या वसतीगृहात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केल्यामुळे बाधित रुग्णांना येत असलेली अडचण दूर करून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे 30 ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड सेंटर सुरु केले. मात्र यावर्षी आलेल्या दुसर्‍या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना करोनाचा संसर्ग होत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतीगृहात 100 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे.

जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहे. ज्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना प्राथमिक स्वरुपात ऑक्सिजन देखील उपलब्ध करून दिला जात आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना रोज सकाळी नाश्ता सकाळ संध्याकाळ दोन वेळेस चहा व रुचकर जेवण दिले जात असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जम्बो कोविड केअर सेंटर शेजारीच श्री साईबाबा तपोभूमी असल्यामुळे सकाळ संध्याकाळ कानावर पडत असलेल्या साईंबाबांच्या आरतीचे स्वर बाधित रुग्णांसाठी आशीर्वाद ठरत असून त्यामुळे रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेवून बरे होत आहेत.

या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला व पुरुष स्वतंत्र उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण बाधित आढळून येत आहेत. रुग्णवाढ थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे येत्या काही दिवसात जरी बाधित रुग्णांची संख्या वाढली तरी आमदार आशुतोष काळे यांनी 100 बेडची तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे दुसर्‍या लाटेची दाहकता जरी जास्त असली तरी 100 ऑक्सिजन बेडचे सुरु होणारे कोविड केअर सेंटर व करण्यात आलेली पूर्वतयारी पाहता सर्वसामान्य बाधित नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com