बेलापूर येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

बेलापूर येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

बेलापूर (वार्ताहर) - येथील जनता आघाडी, कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्था, शनैश्‍वर यात्रा कमिटी यांच्यावतीने तसेच खा. सदाशिव लोखंडे व डॉ. चेतन लोखंडे यांच्या अधिपत्याखालील साई खेमानंद फौंडेशन, संस्कृती मंगल कार्यालय यांच्या सहकार्याने बेलापूर येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले.

शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, भाजप नेते ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, पं. स. सदस्य अरूण नाईक, शिवसेना नेते अशोक थोरे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर मुरकुटे, प्रभात उद्योग समूहाचे अधिकारी हिंगे, बाजार समिती संचालक सुधीर नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे, विलास मेहेत्रे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले आदींच्या हस्ते या सेंटरचे उदघाटन करण्यात आले.

भरत साळुंके यांच्या संकल्पनेतून आणि रविंद्र खटोड यांच्या पुढाकाराने कार्यान्वित झालेल्या या सेंटरमध्ये ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे आहेत परंतू त्यांच्याकडे घरी विलगीकरणाची सुविधा नाही त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त् डॉ. शैलेश पवार व डॉ. रामेश्‍वर राशीनकर यांच्या अधिपत्याखाली येथे रुग्णांची व्यवस्था केली आहे. विलगीकरण काळात येथे दाखल रुग्णांना निशुल्क भोजन व औषधे देण्यात येणार आहेत.

या कामी सामाजिक कार्यकर्ते श्री. अल्ताफ शेख यांनी 50 बेड शिट्स, बादल्या, जग, हँड ग्लोज, टिश्यू पेपरचा संच रुग्णांसाठी दिला. भरत साळुंके व रत्नेश राठी यांनी याकामी संस्कृती मंगल कार्यालय विनामूल्य दिले आहे. याशिवाय उद्योजक अमित लुंकड यांनी दहा वाफेचे यंत्र तर महेश भांड यांनी हॉस्पिटल बेड व चेअर दिली. याशिवाय आणखीही काही सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, प्रकाश चित्ते, भरत साळुंके व रविंद्र खटोड यांनी मनोगत व्यक्त केले. त्याद्वारे त्यांनी सर्वांना नियमांचे पालन करीत आपल्या घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सर्वश्री.बेलापूर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोक साळुंके, विजय ढोले, रमेशचंद्र दायमा, ज्येष्ठ पत्रकार मारुती राशीनकर, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, विराज भोसले, जिजामाता पतसंस्थेचे अध्यक्ष शेषराव पवार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल नाईक, उपाध्यक्ष कमलेश सातभाई, दिवाकर कोळसे, अनिल पवार, अरविंद शहाणे, पोलीस पाटील अशोक प्रधान, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, मनसुखलाल चोरडिया, विजय शेलार, भुषण चंगेडिया, पप्पु पोळ, डॉ. सुधीर काळे, डॉ. रविंद्र गंगवाल, ज्ञानेश्‍वर कुलथे, प्रसाद खरात, सचिन जोशी, प्रशांत बिहानी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन अभिजित रांका यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com