शिंगणापुरात कोव्हिड केअर सेंटर लवकरच होणार सुरु

ना. शंकरराव गडाखांच्या पुढाकार
शिंगणापुरात कोव्हिड केअर सेंटर लवकरच होणार सुरु
file photo

नेवासा (प्रतिनिधी) -

करोनाचा कहर वाढलेला असून नामदार शंकरराव गडाख यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे त्यांच्या सूचनेनुसार शनीशिंगणापूर येथे लवकरच कोविड केअर सेंटर पुर्ववत चालू होणार आहे.

शिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कसबे, विश्‍वस्त पोपटराव शेटे, आप्पासाहेब शेटे यांच्यासह देवस्थानचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष बानकर यांनी सांगितले की आमचे मार्गदर्शक नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील करोना बाधित रुग्णांसाठी आम्ही हे सेंटर देवस्थानच्या वाहनतळावरील भक्तनिवास येथे आम्ही हे सेंटर चालू करणार आहोत. रुग्णांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची व्यवस्था आम्ही करणार आहोत. शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात काय करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. देवस्थानच्या रुग्णालयातील ऑक्सीजन सिलेंडर भेंडा येथील कोविड रुग्णालयात गेले आहेत. ग्रामीण रुग्णालयात कोविडचे रुग्ण ठेवण्यासाठी काय काय करता येईल व त्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली.

गेल्यावर्षी सर्व सुविधा उपलब्ध असणार्‍या राज्यातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये शिंगणापूरचे सेंटर होते. यामध्ये नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे 5 हजार रुग्णांनी येथे उपचार घेतले होते. अनेकांनी शिंगणापूर देवस्थानच्या या कोविड केअर सेंटरचे कौतुक केले होते. त्यावेळी रुग्णांना वाचनालय, मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते. नेवासा तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सोनई मध्ये गुरुवारी एकाच दिवशी 65 रुग्णांची अँटीजेन टेस्ट पॉजीटीव्ह आली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com