लसीकरण : गर्दी ओसरली, पण वशिलेबाजीचा ठप्पा

लसीकरण : गर्दी ओसरली, पण वशिलेबाजीचा ठप्पा

नगरसेवक गाडेंचे आयुक्तांना पत्र ; सावेडी केंद्रात गाववाल्यांचीच नावे

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना लसीकरणात सुसुत्रता यावी यासाठी महापालिकेने ऑनलाईन यादी जाहीर केली. यादीत नाव असणार्‍यांचा लस देण्यात येत असल्याने इतर कोणी फिरकत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली. पण या यादीला वशिलेबाजीचा ठप्पा लागला. शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी यादीत बहुतांश नावे ही सावेडी गावातील असल्याचे सांगत वशिलेबाजी झाल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे.

लस टंचाई निर्माण झाल्याने अन् सेंकड डोसला विलंब होत असल्याने लस मिळावी यासाठी महापालिकेच्या केंद्रात गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्याकरीता महापालिकेने दोन दिवसांपासून ऑनलाईन यादी तयार करून ती केंद्राबाहेर लावली आहे. यादीत नाव असणार्‍यांनाच लस दिली जात आहे. यादीत नाव नसेल तर लस दिली जात नाही, त्यांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये असे आवाहन करत या याद्या सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आल्या आहेत. त्यात नाव असणारेच आज गुरूवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पोहचले. त्यामुळे लसीसाठी होणारी गर्दी अपोआपच ओसरली.

मात्र महापालिकेने तयार केलेल्या ऑनलाईन यादीवरच शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी वशिलेबाजीचा आरोप केला आहे. प्रसिध्द केलेल्या यादीत फक्त नाव आहे. त्यापुढे मोबाईल नंबर नाही. सावेडी केंद्राच्या यादीत बहुतांश नावे सावेडी गावातील असल्याने इतकी एकाच वेळी कशी? वशिलेबाजीमुळेच ही गावातील एकदम नावे असल्याचा आरोप करत गाडे यांनी तशी तक्रार आयुक्तांकडे केली आहे.

वाकळेंनी उघड केला गलथानपणा..

आज लसीकरण झालेल्या सावेडी हेल्थ पोस्टच्या यादीत चंद्रभागा वाकळे असे नाव 65 नंबर आल्याचे दिसून आले. हे नाव माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे यांच्या आईचे आहे. त्यांच्या आईचे 2015 सालीच निधन झाले. त्यांचे नाव यादीत कसे? असे सांगत बहिरनाथ वाकळे यांनीही लसीकरण यादी तयार करताना महापालिकेचा गलथानपणा समोर मांडला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com