अहमदनगर : चुटकीलाही पुरले नाहीत कोव्हॅक्सीनचे डोस

नगर शहरात अनेक ज्येष्ठ लस न मिळाल्याने निराश
अहमदनगर : चुटकीलाही पुरले नाहीत कोव्हॅक्सीनचे डोस

अहमदनगर (प्रतिनिधी) - जवळपास पंधरा दिवसांच्या गॅपनंतर नगर शहरात ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सिनची लस मिळाली. मात्र डोस कमी अन् रांगेतील गर्दी जास्त. त्यामुळे चुटकीलाही डोस पुरले नाहीत. परिणामी अनेक ज्येष्ठांना डोस न मिळाल्याने ते निराश होत घरी परतले.

नगर शहरात यापूर्वी केवळ सावेडी व तोफखाना आरोग्य केंद्रातच ज्येष्ठांचा दुसरा डोस सुरू होता. आज 18 ते 44 वयोगटातील डोस संपल्याने महापालिकेच्या सातही केंद्रावर ज्येष्ठांचा दुसरा डोस सुरू करण्यात आला. आज कोव्हॅक्सिनचा डोस होता. कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने पंधरा दिवसांपासून या लसीचा डोस आलाच नव्हता. आज कोव्हॅक्सिन दुसरा डोस मिळणार या आशेने अनेक ज्येष्ठांनी केंद्रावर धाव घेतली. काही केंद्रांना चाळीस तर काहींना पन्नास लसीचे डोस देण्यात आले होते. लसीचे डोस आणि रांगेतील पाचशेची गर्दी, असे चित्र आरोग्य केंद्राबाहेर होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात लस संपली. लस संपल्याने अनेक ज्येष्ठांचा हिरमोड झाला. आता उद्या कोवीशिल्ड लस मिळणार असल्याने परत कोव्हॅक्सिन कधी येणार? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

केडगावच्या आजोबांची नाराजी

केडगावच्या सुवर्णानगर भागात राहणारे शशिकांत देशपांडे यांना रांगेत उभे राहूनही लस मिळाली नाही. त्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस 18 मार्चला घेतला होता. त्याला आता पन्नास दिवस उलटून गेले आहेत. केंद्राच्या गाईडलाईननुसार त्यांना डोस मिळणे आवश्यक असतानाही तो मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत निदान ज्येष्ठ आणि पहिली लस घेतलेल्यांना तरी कोव्हॅक्सिन लस देताना प्राधान्य द्या, अशी मागणी ‘नगर टाइम्स’च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com