नगर शहरात पुन्हा कडक निर्बंध

काय सुरू, काय बंद?
नगर शहरात पुन्हा कडक निर्बंध
संग्रहित

अहमदनगर|Ahmedagar

दोन दिवसांपूर्वी महापालिकेने निर्बंधात थोडी शिथीलता दिली होती. परंतु, शनिवार, रविवार नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने पुर्वीचे निर्बंध पुन्हा लागू करण्याचे आदेश मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी सायंकाळी काढले. रविवारी मध्यरात्रीपासून 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे. यामुळे दोन दिवस खुले झालेली किराणा दुकाने, फळे, भाजीपाला विक्री, मटन-चिकण दुकाने पुन्हा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

नगर शहरात वाढती रूग्णसंख्यामुळे महापालिका प्रशासनाने 2 ते 10 मे या काळात नगर शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला. या काळात फक्त पेट्रोलपंप, दूध, हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू होते. या कडक निर्बंधाची मुदत पुन्हा 15 मेपर्यंत वाढविण्यात आली होती. रूग्णसंख्येत घट होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच शुक्रवारी आयुक्त गोरे यांनी नवीन नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार 15 ते 24 मे या काळात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीविक्री, अंडी, मटन विक्री सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. शुक्रवारी आदेश निघाल्यानंतर शनिवारी सकाळीच किराणा, फळे, भाजीपाला, मटण-चिकण खरेदीसाठी नागरिकांनी एकाच वेळी गर्दी केली. नगर शहरात रूग्णसंख्या घटत असली तरी नगर ग्रामीणमध्ये रूग्ण वाढत आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील रूग्ण वाढही कायम आहे. यामुळे गर्दीतून संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता दोन दिवस खुले करण्यात आलेले दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

............

हे राहणार सुरू

- अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार

- घरपोहोच गैस वितरण सेवा

- सर्व बँका

- दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (सकाळी 7 ते 11)

- पशुखाद्य विक्री (सकाळी 7 ते 11)

..........

हे राहणार बंद

- किराणा दुकाने

- भाजीपाल व फळे बाजार

- सर्व खाजगी आस्थापना पुर्णतः बंद राहतील

- अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com