
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनाच्या (Covid 19) पहिल्या लाटेपासून बंद (First Wave) असणार्या शाळांचे दरवाजे सोमवारपासून (Monday) उघडणार आहे. कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली आहे. त्यानूसार जिल्ह्यात ग्रामीण भागात (Rural Areas) पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 26 तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या 96 आशा असून यात करोनाचा प्रतिबंध असणार्या भागातील शाळा वगळून उर्वरित ठिकाणी शंभर टक्के शाळा सुरू होण्याची आशा माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला (Department of Secondary and Primary Education) आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 61 गावात करोनामुळे पुढील दहा दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला असून या ठिकाणी शाळा बंद (School Close) राहणार आहेत. दुसरीकडे सुरू होणार्या शाळांमध्ये करोनाचे सर्व नियमांचे काटेकारे पालन करण्यात येणार असून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतर, विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, एकाआड एक विद्यार्थी यांना बसविण्यात येणार आहे. यासह शिक्षण विभागाच्या (Department of Education) आदेशात शाळा सुरू झाल्यानंतर देखील पहिले दोन आठवडे अध्यापन न करता विद्यार्थ्यांना शाळेसाठी मानसिकपणे तयार करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (Education Officer) यांच्या स्तरावरून तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत. यात गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शोलय पोषण विभागाचे अधिक्षक, केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती (विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ (Specialist), विषय साधन व्यक्ती), तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य शासकीय विभागातील अधिकार्यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचार्यांनाही शाळा भेटी करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये शाळा सुरळीत व उत्साहवर्धक वातावरणात सुरू राहतील यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांनाही शाळा सुरू राहण्यासाठी प्रेरक शाळा भेटी करण्याबाबत विनंती करावी. शाळा भेटीचा अहवाल दुपारी 1.30 वाजेपर्यंत न चुकता नगरला पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंत शाळांची संख्या 2 हजार 122 असून यातील सुमारे 200 शाळा सुरू होवू शकणार नाहीत. उर्वरित शाळा नियमितपणे सुरू होतील, असा शिक्षण विभागाचा होरा आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सध्या 225 आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू असून त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
एसटीची अडचण
नगरसह अनेक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा, ज्युनिअर कॉलेजसाठी येत असतात. ग्रामीण भागातून अनेक ठिकाणी अद्याप एकही एसटी बस सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना शाळापर्यंत पोहचण्यात अडचण येणार आहे. यासह जोपर्यंत विद्यार्थी नियमित पास काढून एसटीने प्रवास करणार नाहीत. तोपर्यंत एसटीला उत्पन्न मिळून बसेस सुरू करता येणार नाहीत.