अहमदनगर (प्रतिनिधी) -

कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमविणार्या लग्न सोहळ्यावर आता पोलीस प्रशासनाचा वॉच असणार

आहे. 8 ते 14 मार्च काळात होणार्या 45 लग्नांचे पोलीस व्हिडीओ शुटींग करणार असल्याची माहिती कलेक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता लग्नात 50 वर्हाडीलाच प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र अनेक लग्न समारंभाला होणारी गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेलींगमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी कडक उपाय योजना करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोमवारी कलेक्टर भोसले यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर कलेक्टर भोसले यांनी लग्न समारंभ आणि हॉटेलिंग संदर्भातील निर्णयाची घोषणा केली.

लग्न सोहळ्याला होणारी गर्दी अटोक्यात आणण्यासाठी पोलीस सकाळपासूनच लग्नाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ते सोहळ्याचे व्हिडीओ शुटिंग करतील. 50 पेक्षा जास्त वर्हाडी जमा झाली तर कारवाई केली जाणार आहे. 8 ते 14 मार्च दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यात 45 लग्न आहे. या लग्न सोहळ्यावर आता पोलिसांचा वॉच असणार आहे. 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू झाली असली तरी तेथेही गर्दी होते आहे. तेथील गर्दीवर अंकुश घालण्याची जबाबदारीही पोलिसांवर टाकण्यात आली आहे. पोलीस अचानक हॉटेलमध्ये धाडी टाकून नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करणार आहेत. हॉटेलमध्ये 50 टक्क्यापेक्षा उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

सिव्हील सर्जनच्या रिपोर्टनंतर शाळांचा निर्णय..

आठवी ते बारावी आणि कॉलेज सुरू झाल्याने तेथूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता कलेक्टरांनी शाळा सुरू ठेवयाच्या की नाहीत यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. सिव्हील सर्जनच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्यांचा अहवाल येताच दोन दिवसामध्ये शाळांचा निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.