करोनामुळे सुपा औद्योगिक वसाहतीचे यंत्रे थांबली

भीतीमुळे परप्रांतीय कामगार गावाकडे परतले
करोनामुळे सुपा औद्योगिक वसाहतीचे यंत्रे थांबली

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीमधील यंत्रे करोना महामारीने थांबली आहे.

करोनाच्या वाढत्या दहशतीमुळे येथील कामगारांनी गावाकडे कूच केल्याने औद्योगिक वसाहती ओस पडू लागल्या आहेत.

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. गेल्याआठ दिवसांपासून संचारबंदीला सुरूवात झाली असून ही संचार बंदी 30 एप्रिलपर्यंत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढे ही संचार बंदी वाढण्याची चिन्हे आहेत व मागील वर्षी याच परप्रांयतीय कामगारांचे मोठे हाल झाले होते.

येथे काम करणार्‍या अनेकांना मुंबई, पुणे येथून उत्तरप्रदेश, बिहारचा रस्ता पायी धरावा लागला होता. वाटेत उपासमार आणि अन्य संकटांना सामोरे जावे लागले होते. गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्यामुळे या परप्रांतिय कामगारांनी यावेळी वेळी आधीच सावध भूमिका घेत घरचा रस्ता धरला आहे. परप्रांतीय कामगार गावी परंतु लागल्याने औद्योगिक वसाहती ओस पडू लागली आहे, तर त्याच्यावर अवलंबून असले तरी कारखाने व छोटे-मोठे व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.

हा कामगार वर्ग एकदा गावाकडे गेल्यावर महिना दोन महिने परत येणार नाहीत. अशा परिस्थितीत कामगार कोठून आणावयाचे असा प्रश्न आहे. करोना संकटाने जगाचे कालचक्र थांबले आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. सुप्यासह राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतीमध्ये चीर शांती पसरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील कामगारांनी गावचा रस्ता धरल्याने त्याच्यावर अवलंबून असणारे घर मालक, हॉटेल चालक, खानावळवालेही मोठ्या संकटात सापडले आहे.

मनाला छेदणारा रुग्णवाहीकेचा सायरन

सध्या नगर-पुणे महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे. एरवी अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरील आवाजाकडे फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते. मात्र, आता महामार्गावर भयान शांतता असून दिवसभरात याठिकाणी धावणार्‍या रुग्णवाहिकेचा सायरन मनाला छेद देऊन जात असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com