करोना रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
करोना रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्ग (Corona contagion) रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून (Finding individuals in contact with an infected patient) त्यांची चाचणी करावी. जितक्या लवकर अशा व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जातील तितके लवकर जिल्ह्यातील प्रादुर्भाव नियंत्रणात आणू. त्यामुळे यासाठी आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी (The health system should take action), अशी सूचना जिल्हा प्रशासनाने (Notice by district administration) केली आहे.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा (Review of Corona Prevention Measures) जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Resident Deputy Collector Sandeep Nichit) यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना (instructions) दिल्या. उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्‍हे, जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय येथून तर उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक हे तालुका स्तरावरून यात सहभागी झाले होते.

जिल्हयात करोना रुग्ण संख्या वाढत (District Covid 19 Patient) आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना शोधणे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करणे (start treatment) महत्वाचे आहे. त्याच बरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे अधिक महत्वाचे आहे. करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संसर्ग साखळी तोडणे आवश्यक असून त्यादृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली. रुग्ण वाढ होत असताना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी कोविड केअर सेंटर (Covid Care Center) (सीसीसी) आणि डिस्ट्रीक्ट कोविड हेल्थ सेंटर(District Covid Health Center) (डीसीएचसी) अद्यावत करणे अपेक्षित आहे.

तेथील सुविधांची पाहणी करून आवश्यक तयारी त्याठिकाणी असणे अपेक्षित आहे. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहे तेथे कडक प्रतिबंध लावण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्याची अंमबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी निचीत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com