तिसगाव (वार्ताहर) -

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, करंजी, तिसगाव पाठोपाठ मिरी गावात देखील करोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतीने

सोमवारपासून पुढील चार दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट व उपसरपंच अरुण बनकर यांनी दिली. मिरी येथे देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीने चार दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला असून करोनाची साखळी

तोडण्यासाठी व रुग्ण संख्येत आणखी वाढ होऊ नये, म्हणून पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट, उपसरपंच अरुण बनकर, ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांनी दिली आहे. जनता कर्फ्यूमध्ये करोना नियम व अटींचे पालन करा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांनी केले आहे.