तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे - खा. विखे

तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे - खा. विखे

राहाता |वार्ताहर| Rahata

तिसर्‍या लाटेत कोविड रुग्णसंख्येचा वाढता (Covid 19 Patient in the Third Wave) आलेख पाहता आरोग्य विभागाने (Department of Health) पुन्हा सर्वोतोपरी उपाययोजनांची तयारी करून सतर्क राहावे, अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिल्या.

तिसर्‍या लाटेत कोविड रुग्णांची (Covid 19 Patient in the Third Wave) वाढती संख्या लक्षात घेवून खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) आरोग्य सुविधांसह सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी (Oxygen Plant inspection) केली. लोणी (Loni) येथील पीव्हीपी कॉलेजमध्ये (PVP Collage) कोविड सेंटर (Covid Center) पुन्हा करण्याबाबत त्यांनी बैठक घेवून सूचना दिल्या. ग्रामीण रुग्णालय राहाता आरोग्य केंद्राची (Rural Hospital Rahata Health Center) पाहणी अधिकारी व पदाधिकार्‍यांचे समवेत करून त्यांनी उपाययोजनांबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.

मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची (Covid 19 Patient) संख्या वाढत आहे. तिसर्‍या लाटेची सुरूवात असली तरी वेळीच दखल घेणे हेच सर्वांच्या हातात आहे. सद्य परिस्थितीत रुग्णसंख्येचा आलेख ज्या गतीने वाढत चालला आहे ते पाहता एक डॉक्टर (Doctor) या नात्याने आरोग्य सुविधांना पुन्हा सक्रीय करण्याची वेळ आली असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

मागील संकटाच्या काळात राहाता तालुक्यात आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, आरोग्य विभागाने केलेले काम राज्यात वेगळेपण दाखविणारे होते.सामान्य रुग्णांना वेळीच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचा आवर्जून उल्लेख खा. विखे (MLA Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केला.

तिसरी लाट येवू नये ही अपेक्षा असली तरी अद्यापही लस न घेतलेले किंवा काही लक्षण आढळून आलेल्या व्यक्ती वेळीच उपचार घेत नाहीत. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यामध्ये होत असल्याकडे लक्ष वेधून खा. विखे म्हणाले की, वाढती रुग्णसंख्या पाहता तालुक्यातील सर्व आरोग्य सुविधा पुन्हा सक्रीयतेने सुरू करणे महत्वाचे आहे. यासाठी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह सर्वच सुविधांचा आढावा आपण अधिकार्‍यांसमवेत घेवून सूचना केल्या असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com