करोनामुळे श्रीरामपुरात नेमका किती जणांचा मृत्यू?

मिशन वात्सल्य समितीचा प्रश्न : सर्वेक्षणाची गरज, लाभार्थी आर्थिक लाभास मुकण्याची शक्यता
करोनामुळे श्रीरामपुरात नेमका किती जणांचा मृत्यू?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनामुळे श्रीरामपूर शहरात नेमका किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न तालुका मिशन वात्सल्य समितीला पडला. जन्म मृत्यूचा लेखाजोखा ठेवणार्‍या पालिकेकडे याची माहितीच नाही. करोनाची दुसरी लाट ओसरून सहा महिने झाल्यानंतरही पालिकेकडे फक्त स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले, अशाच करोना मयतांची नावे आहेत. इतरत्र मयत झालेल्या करोना मृतांची माहिती संकलित नाही. त्यामुळे श्रीरामपूर शहरात किती नागरिक करोनामुळे मयत झाले आहेत? याची माहितीच श्रीरामपूर पालिकेत उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत उघडकीस आला.

सहायक गटविकास अधिकारी एस. आर. दिघे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची तिसरी बैठक झाली. या बैठकीस अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख, समितीच्या सदस्य सचिव व पंचायत समितीच्या प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी आशा लिप्टे, सदस्य तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक पी. एम. करंदीकर, कनिष्ठ लिपिक एस. एन. पिरजादे, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती एम. जी. दुरगुडे, पालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती एस. डी. गव्हाणे, पी. बी. बडाख, एस. एच. शिंदे, ए. पी. खेडकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com