कोविडमुळे मृत्यू झाल्यास मिळणार्‍या दहा लाखांच्या अनुदानाकडे दुर्लक्ष

संदेश कार्ले || मुख्य कार्यकारी यांचे वेधले लक्ष
कोविडमुळे मृत्यू झाल्यास मिळणार्‍या दहा लाखांच्या अनुदानाकडे दुर्लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत दहा वर्षापेक्षा कमी सेवा पूर्ण केलेल्या आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा शासन निर्णय झालेला आहे. मात्र, शिक्षण विभागात कार्यरत असणार्‍या अशा कर्मचार्‍यांचा आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास शिक्षण विभागास विसर पडला आहे. विशेष म्हणजे या योजनेबाबत शिक्षण विभागातील लिपिकांना माहित नसल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे लक्ष वेधले आहे.

जिल्हा परिषदेत दहा वर्षापेक्षा कमी सेवा असणार्‍या आणि कोविडच्या काळात करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. यासाठी संबंधीत विभागाने प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला सादर करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लिपिकांनी संबंधीत कर्मचार्‍यांचे अनुदानाचे प्रस्ताव तयार केलेले नाहीत.

दरवेळी चिरीमिरीची सवय असल्याने संबंधीत लिपिकांनी हे प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवले नसल्याचा गंभीर आरोप कार्ले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे. तसेच तातडीने संबंधीत मयत कर्मचार्‍यांचे प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला न पाठवल्यास 15 दिवसांनी संबंधीत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना बदडण्याचा इशारा कार्ले यांनी दिला आहे.

शिक्षण विभागातील संबंधीतांना आदेशाची प्रत दिल्यानंतर त्यांनी हा आदेश तालुका पातळीवर माहितीसाठी पाठवावा, आशा सूचना दिल्या. यावेळी प्रभारी उपशिक्षण अधिकरी जयश्री कार्ले यांना निवेदन दिले. तसेच संबंधीतांचे प्रस्ताव त्वरित मागून घेऊन शासनास पाठवावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com