कोविड मृत्यू झालेल्या कुटूंबाला केंद्राच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्यचा लाभ द्या

श्रावण बाळ माता पिता संघाची पीएम अन् सीएमकडे मागणी
कोविड मृत्यू झालेल्या कुटूंबाला केंद्राच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्यचा लाभ द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दारिद्रय रेषेच्या यादीत नाव समाविष्ट नसले (name was not included in the poverty line list), करोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला (family who died of corona) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्य योजनांचा (National Social Financial Schemes of the Central Government) व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा (Benefit from state government schemes), अशी विनंती श्रावणबाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर (Rajendra Nimbalkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केली आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government ) राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्य योजने अंतर्गत दारिद्रय रेषेच्या यादीत नाव असणार्‍या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबास 15 दिवसाच्या आत 20 हजारांची आर्थिक मदत केली जाते. तसेच या कटुंबतील 39 वर्षावरील विधवा महिलांना राष्ट्रीय विधवा महिला पेन्शन योजनेतून दरमहा 1 हजार तर 59 वर्षारील स्त्री-पुरुषांना राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेतून दरमहा 1 हजार रुपये वेतन दिले जाते. दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव नसेल तर या योजनांचा लाभ मिळत नाही.

सद्यस्थितीत करोना महामारीमुळे (Corona Pandemic) कित्येक कुटुंब उध्वस्त (family was devastated) झाली आहेत. आशा कुटुंबाना ही कुटूंब दारिद्रय रेषेच्या यादीत नसली तरी या योजनांचा तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी विनंती निंबाळकर याना पंतप्रधान मोदी यांचेकडे केली आहे. तर विशिष्ट परिस्थितीत श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेची (Shravan Bal and Sanjay Gandhi Niradhar Yojana) प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार शासनाने स्वतः कडे राखून ठेवला असून याच अधिकाराचा वापर करून करोना पीडित कुटुंबातील व्यक्तीची सुमोटो प्रकरणे करून आशा कुटुंबाना दिलासा द्यावा, अशी विनंती निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांना ही केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com