काही तालुक्यात करोना सुसाट, तातडीने प्रतिबंध करा

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आदेश
काही तालुक्यात करोना सुसाट, तातडीने प्रतिबंध करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या (Ahmednagar District) काही तालुक्यात करोना (Covid 19) सुसाट असल्याचे दिसून येत आहे. ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात (Under control) आणणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संसर्ग साखळी तोडणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी (Implementation of preventive measures) कडकपणे करणे याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या (third wave of covid 19)अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने (district administration) तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी करोना प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या गंभीरपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, विशेषता सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे आदी ठिकाणी नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. नागरिकांनीही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केले तर करोना प्रादुर्भाव रोखण्यास अडचणी येतील याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे. ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील ही गर्दी रोखावी. राज्य शासनाने दिलेल्या सवलती व्यतिरिक्तच्या वेळेत आस्थापना सुरु असल्याचे दिसल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एखाद्या ठिकाणी गर्दी झाली तर तात्काळ तेथील यंत्रणांनी त्याची माहिती मिळताच कारवाई करणे अपेक्षित आहे. कारण ही गर्दी करोना प्रादुर्भाव वाढण्याचे निमित्त ठरु नये, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्ण आढळून आलेल्या भागात भेटी देऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com