सोनईत 41 भाजी विक्रेत्यांची अ‍ॅन्टीजेन चाचणी

काहींनी काढला पळ
सोनईत 41 भाजी विक्रेत्यांची 
अ‍ॅन्टीजेन चाचणी

सोनई (वार्ताहर) -

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सोनई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाजी मंडईतील 41 व्यावसायिकांची रॅपीड

अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. या तपासणी दरम्यान अनेक व्यावसायिकांनी तपासणीच्या भितीने पळ काढला.

दोन दिवसाचा लॉकडाऊन झाल्यानंतर सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. करोना संसर्गाची वाढती स्थिती लक्षात घेवून 41 भाजीपाला विक्रेत्यांची करोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यातील कुणीच संक्रमित आढळला नाही.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे, सरपंच धनंजय वाघ, नितीन दरंदले, संतोष चपळे, सखाराम राशिनकर, सचीन पवार, ओहळ आदी उपस्थित होते. भाजी मंडईत व्यवसाय करायचा असेल तर तपासणीचा अहवाल आवश्यक करण्यात आला आहे. आरोग्य पथकाने महादेव मंदीर जिल्हा परिषद शाळेत 178 जणांची रॅपीट अ‍ॅन्टीजेन तपासणी केली असता 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com