तब्बल 11 महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

श्रीरामपुरातील खूनप्रकरणी न्यायालयाच्या आदेश
तब्बल 11 महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील मिल्लतगर भागात राहणार्‍या तरुणाचा अक्षय कॉर्नर परिसरात मागील फेब्रुवारी महिन्यात पाण्यात बुडवून खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये तब्बल 11 महिन्यांनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाफराबाद येथील दोघांविरुध्द खुनाचा दाखल करण्यात आला आहे.

फेब्रुवारी 2021 या महिन्यात शहरातील मिल्लतनगर, वॉर्ड नं. 1 या परिसरात राहणारा जुनैद जाकीर पटेल या तरुणास मागील भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून जाफराबाद येथील सलीम उर्फ सलमान मुनीर शेख, (वय 27), अख्तर मुनीर शेख (वय 52) या दोघांनी जुनैद यास बेदम मारहाण करून पाण्यात बुडवून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जुनैदचा मोबाईल काढून घेतला.

याप्रकरणी जुनैदचे वडील जाकीर हुसेन पटेल (वय 70) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) अन्वये चौकशी अर्ज क्र. 252/2022 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 34/2021 प्रमाणे भादंवि कलम 302, 201, 34 अन्वये काल गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे करत आहेत.

Related Stories

No stories found.