महिलेचे दुर्गारूप; शहरातील ‘त्या’ कुरियरवाल्याची बनवाबनवी

महिना उलटून देखील पार्सल पाठविले नसल्याचा प्रकार उघड
महिलेचे दुर्गारूप; शहरातील ‘त्या’ कुरियरवाल्याची बनवाबनवी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील माळीवाडा भागातील ‘त्या’ कुरियरवाल्याची बनवाबनवी एका महिलेने दुर्गारूप धारण करताच उघडकीस आली. घेतलेले पार्सल महिना उलटून देखील दिलेल्या पत्त्यावर न पाठविता दुकानातच ठेवल्याचा प्रकार पार्सलचे ट्रॅक डिटेल्स तपासल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.

माळीवाडा वेस येथील एका कुरियर चालकाकडे 30 ऑगस्ट रोजी एका महिलेने औषधी तेलाचे पार्सल संगमनेरला पाठविण्यासाठी दिले होते. मात्र दिलेले कुरियरचे पार्सल संबंधित व्यक्तींकडे महिना उलटूनदेखील पोहचले नसल्याने त्या महिलेने वारंवार कुरियर चालकाकडे चकरा मारून विचारणा केली. आज-उद्या सदर पार्सल संबंधितांना मिळणार असल्याचे त्या गोडबोल्या कुरियर चालकाने आश्वासने दिली.

मात्र शेवटपर्यंत पार्सल संगमनेरला पोहचला नसल्याने महिलेचा संयमाचा बांध फुटला, महिलेने थेट माळीवाडा वेस येथील कुरियर चालकाचे दुकान गाठून पार्सल पाठवल्याचे ऑनलाईन डिटेल्स चेक केले असता, पार्सल पाठविण्यात आले नसल्याचे उघडकीस आले. माळीवाडा वेस येथील ‘त्या’ कुरियर चालकाच्या अनेक तक्रारी असून, अनेकांचे महत्त्वाचे कागदपत्र व पार्सल त्याने गहाळ केल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com