दाम्पत्याला गज व धारदार शस्त्राने मारहाण करुन जबरी चोरी

गुन्हा दाखल || नेवासा तालुक्यातील गोधेगावची घटना
दाम्पत्याला गज व धारदार शस्त्राने मारहाण करुन जबरी चोरी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरुन दाम्पत्याला गज व चाकूसारख्या हत्याराने मारहाण करुन चोरी केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोमनाथ यादव क्षीरसागर, (वय 40), धंदा- शेती यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 26 एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोधेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी तिघे अज्ञात चोरटे आले. त्यातील एकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन घरामधील सामानाची उचकापाचक करून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी व त्याची पत्नी अशांनी त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीस त्याचेकडील असलेल्या लोखंडी गजाने व चाकुसारख्या काहीतरी धारदार हत्याराने हाता पायावर डोक्यावर मारहाण करून जखमी करून फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये घेऊन पळून गेले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 336 भारतीय दंड विधान कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करत आहेत.

Related Stories

No stories found.