
नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata
यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढणार असून कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची गर्दी होऊ लागली आहे. शासनाची कोणत्याही प्रकारे परवानगी नसलेल्या कापूस बियाण्यांची शेतकर्यांनी खरेदी करू नये. या बियाण्यामुळे जमिनीचा पोत खराब होवू शकतो. बियाणाविषयी तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे व पंचायत समिती कृषी अधिकारी प्रताप कोपनर यांनी केले आहे.
बियाणेची खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी, बियाणेचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पाकीटातील थोडे बियाणे पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेंची पाकिटे सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. तसेच पाकीटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासुन घ्यावे. बोगस बियाणे विषयक काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा असे त्यांनी म्हटले आहे.