नगरसेवकांची शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
नगरसेवकांची शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील मोठ्या प्रमाणात खड्डे (City Road Pits) पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करतांना स्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न (Creating health issues) निर्माण झाला असून महापालिकेने (Municipal Corporation) तातडीने रस्त्यांचे पॅकिंग करण्याची मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे (City Road Pits) दररोज छोटे-मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहे.त्यामुळे नगरसेवकाना (Corporators) नागरिकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी लवकरात-लवकर शहरातील खड्ड्यांचे पॅकिंग करण्याची मागणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले (Avinash Ghule), विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर (Sampat Baraskar), मनोज कोतकर (Manoj Kotkar),अजिंक्य बोरकर (Ajikya Borkar), नगरसेवक समद खान (Samad Khan), अमोल गाडे (Amol Gade), नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे (Vineet Paulbudhe), बाळासाहेब पवार (Balasaheb Pawar), निखिल वारे (Nikhil Ware), सतिष शिंदे (Satish Shinde) यांनी केली आहे.

त्यावर आयुक्त गोरे (Commissioner Shankar Gore) यांनी शहरातील खड्ड्यांची पॅकिंग करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच खड्डे बुजविण्याचे काम सुरू होणार आहे. पुढील काळात शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात निधी आणून दर्जेदार रस्त्याचे कामे हाती घेतले जातील, पुन्हा-पुन्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ महापालिकेला येणार नाही असे काम करू तसेच अमृत भुयारी गटार योजनेमुळे शहरातील गावठाण भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. भुयारी गटार योजनेचे कामही मार्गी लागणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com