मनपा पाणी योजनेतून कल्याण रोडवरील टाकीत पाणी सोडणार

महापौर शेंडगे : पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक
मनपा पाणी योजनेतून कल्याण रोडवरील टाकीत पाणी सोडणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरा लगत असणार्‍या कल्याण रोड परिसरातील (area of ​​Kalyan Road) रहिवाशी लोकसंख्येचा मोठा भाग आहे. या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या (Drinking water problem) अनेक वर्षापासून आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत (Water Supply Department) या परिसरामध्ये पाणी अवेळी व कमी दाबाने 10 ते 12 दिवसानंतर मिळते. नागरिकांना रात्री अपरात्री पाण्यासाठी जागे रहावे लागते. विशेषत: महिला वर्ग यांना खूप त्रास होतो. कल्याण रोडवरील शिवाजी नगर (Shivaji Nagar) भागासाठी टाकी व पाईप लाईन टाकलेली आहे. परंतु ग्रॅवीटीने टाकी भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. 15 ऑगस्टपर्यंत मनपा पाणी योजनेतून (Municipal water scheme) या टाकीत पाणी सोडण्यात येर्ईल, आश्वासन महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी दिले.

पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक (Water Supply Department Meeting) महापौर शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी घेतली. यावेळी अनिल बोरूडे, संभाजी कदम, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, गणेश कवडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संतोष गेणाप्पा, उपायुक्तयशवंत डांगे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौर शेंडगे यांनी बायपास वरून पाणी पुरवठा का केला जात नाही, याबाबत माहिती घेणार असून शहरातील मध्यवस्तीतील भाग, उपनगरातील काही भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. याबाबत फिटर, हेड व्हॉलमन यांनी याबाबत काय समस्या असतील त्या सोडून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होईल, यासाठी कार्यवाही करण्यात येत येईल. उपमहापौर भोसले यांनी सांगितले, शांतीनगर (Shantinagar), समर्थनगर (Samarthnagar) येथील पाणी टाकीमधून या परिसरामध्ये सुध्दा पाणी पुरवठा लवकरच केला जाईल. पाणी पुरवठा विभागामार्फत कोठे कामे चालू आहेत, याची माहिती घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक नळकांडे, शिंदे, जाधव, बोरूडे यांनी शिवाजी नगर कल्याण रोड आदी भागातील पाण्याच्या प्रश्नाबाबत चर्चेमध्ये भाग घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com