रस्त्यावरील मोकाट जनावरांना होणार दंड

जागेवर पाच पट दंड, सात दिवसांनंतर लिलाव
रस्त्यावरील मोकाट जनावरांना होणार दंड

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील मोकाट जनावरे महापालिकेने पकडले अन् कोंडवाढ्यात टाकले तर मोकाट जनावरांच्या मालकांना आर्थिक चटका बसणार आहे. जागेवर जनावरं पकडल्यानंतर मालक आला तरी पाचपट दंड भरावा लागणार आहे.

कोंडवाड्यात टाकलेले जनावरे सात दिवसांत सोडून नेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा लिलाव महापालिका करणार आहे. तसा फतवा आज गुरूवारी महापालिकेने काढला.

शहरातील मोकाट जनावरे पकडणे, कोंडवाडा करणे, देखभाल व इतर कामे करण्याचा ठेका पिंपरी चिंचवडमधील पिपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला देण्यात आला आहे. ही संस्था रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकणार आहे. कोंडवाड्यात टाकलेले जनावरे सात दिवसांत मालकाने सोडून न्यायची आहेत. सात दिवसांत जनावरे सोडून न नेल्यास महापालिकेमार्फत त्याचा लिलाव केलाा जाणार आहे. जनावरांच्या मालकांनी दक्षता घेऊन जनावरे मोकाट सोडू नयेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

.................

असा असेल दंड (प्रतिदिन, प्रतिजनावर)

बकरी, मेंढी, करडू, बोकड - 280

गाढव, डुक्कर, वासरू- 280

घोडा, गाय, गोर्‍हा, बैल, खेचर, घोडी - 360

उंट, म्हैस, रेडा- 920

हत्ती - 1020

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com