राहाता | प्रतिनिधी | Rahata

राहाता तालुक्यातील करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरीक नियम पाळत नसल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

राहाता तालुक्यात करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व खबरदीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व प्रमुख गावातील आठवडे बाजार व जनावरांचा बाजार ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहे. आठवडे बाजार व जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश तहसिलदार कुंदन हिरे यांनी काढले आहे.