काळजी घ्या! जिल्ह्यात आजही सातशेहून अधिक रुग्ण; संगमनेरमध्ये सर्वाधिक

काळजी घ्या! जिल्ह्यात आजही सातशेहून अधिक रुग्ण; संगमनेरमध्ये सर्वाधिक

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी सातशेहून अधिक नव्या रुग्णांची वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ७३१ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १६७, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३२७ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २३७ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती?

संगमेनर - १८८

पाथर्डी - ६२

श्रीगोंदा - ६२

पारनेर - ६०

नगर ग्रामीण - ५८

कर्जत - ४९

राहाता - ३७

शेवगाव - ३५

राहुरी - ३२

मनपा - ३१

कोपरगाव - २९

श्रीरामपूर - २८

अकोले - २२

जामखेड - १३

इतर जिल्हा - १३

नेवासा - ११

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

Related Stories

No stories found.