COVID19 : जिल्ह्यात आज तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

तर ३ हजार ११७ रूग्णांना डिस्चार्ज
करोना अपडेट
करोना अपडेट

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यात सलग तीन दिवस दिलासा मिळाल्यानंतर बुधवारी पुन्हा 3 हजारांहून अधिक करोना बाधित समोर आले आहेत. यामुळे करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 22 हजार 705 असून काल 3 हजार 117 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात आतपर्यंत 1 लाख 43 हजार 528 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 85.36 टक्के आहे. काल 3 हजार 122बाधित वाढले. उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 22 हजार 705 झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 67, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 178 आणि अँटीजेन चाचणीत 877 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 101, अकोले 31, जामखेड 82, कर्जत 106, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 50, नेवासा 18, पारनेर 111, पाथर्डी 118, राहता 31, राहुरी 64, संगमनेर 93, शेवगाव 152, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 06, कँटोन्मेंट बोर्ड 12, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 397, अकोले 10, जामखेड 2, कर्जत 22, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 132, नेवासा 25, पारनेर 34, पाथर्डी 46, राहाता 149, राहुरी 35, संगमनेर 104, शेवगाव 26, श्रीगोंदा 23, श्रीरामपूर 81, कँटोन्मेंट बोर्ड 25 आणि इतर जिल्हा 12 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 877 जण बाधित आढळुन आले. मनपा 85, अकोले 5, जामखेड 25, कर्जत 2, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 63, नेवासा 52, पारनेर 155, पाथर्डी 10, राहाता 124, राहुरी 79, संगमनेर 43, शेवगाव 25 श्रीगोंदा 135, श्रीरामपूर 31, कँटोन्मेंट 17 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात एकाही करोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

मनपा हद्दीत 583, राहाता 304, पारनेर 300, नगर ग्रामीण 245, संगमनेर 240, शेवगाव 203, श्रीगोंदा 188, राहुरी 178, पाथर्डी 174, कर्जत 130, कोपरगाव 123, श्रीरामपूर 118, जामखेड 109, नेवासा 95, भिंगार 54, अकोले 46, अन्य जिल्हा 20, लष्कर रुग्णालय 12 अशी बाधित संख्या आहे.

मनपा हद्दीत 583, राहाता 304, पारनेर 300, नगर ग्रामीण 245, संगमनेर 240, शेवगाव 203, श्रीगोंदा 188, राहुरी 178, पाथर्डी 174, कर्जत 130, कोपरगाव 123, श्रीरामपूर 118, जामखेड 109, नेवासा 95, भिंगार 54, अकोले 46, अन्य जिल्हा 20, लष्कर रुग्णालय 12 अशी बाधित संख्या आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com