करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात 732 रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये 197 (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत 308 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) 218 रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - 160

पारनेर - 86

अकोले - 85

पाथर्डी - 78

श्रीगोंदा - 48

राहाता - 45

नगर शहर - 38

नगर ग्रामीण - 34

नेवासा - 30

शेवगाव - 29

राहुरी - 25

श्रीरामपूर - 20

जामखेड 16

कर्जत - 16

इतर जिल्हा - 07

कोपरगाव - 05

भिंगार - 01

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com