COVID19 : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्ण; ३३३ रुग्णांना डिस्चार्ज

सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक
COVID19 : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्ण; ३३३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात आज ३३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६३५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९८ आणि अँटीजेन चाचणीत २२३ रुग्ण बाधीत आढळले.

COVID19 : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्ण; ३३३ रुग्णांना डिस्चार्ज
31 जुलैपर्यंत शिर्डीचे नवे विश्‍वस्त मंडळ

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, नगर ग्रा. ०३, पारनेर ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०७, जामखेड ०४, कर्जत ०८, नगर ग्रा.०७, नेवासा १९, पारनेर ३५, पाथर्डी २४, राहता १३, राहुरी ०१, संगमनेर ३०, शेवगाव १०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

COVID19 : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्ण; ३३३ रुग्णांना डिस्चार्ज
राहाता शहरात वृक्षांचा पाचवा वाढदिवस उत्साहात साजरा

अँटीजेन चाचणीत आज २२३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले २१, जामखेड ३६, कर्जत २१, कोपरगाव १३, नगर ग्रा. १९, नेवासा ०७, पारनेर २५, पाथर्डी ०६, राहाता ०२, राहुरी १७, संगमनेर १४, शेवगाव १०, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ४४, जामखेड १६, कर्जत २०, कोपरगाव ०६, नगर ग्रा. १७, नेवासा ०७, पारनेर ५७, पाथर्डी ५२, राहता १६, राहुरी ०९, संगमनेर २२, शेवगाव १८, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

COVID19 : जिल्ह्यात आजही चारशेहून अधिक रुग्ण; ३३३ रुग्णांना डिस्चार्ज
शाळा पुन्हा सुरु होणार; नव्याने शासन निर्णय जारी

जिल्ह्यातील स्थिती?

बरे झालेली रुग्ण संख्या : २,७४,३६२

उपचार सुरू असलेले रूग्ण : २६३५

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५९६०

एकूण रूग्ण संख्या : २,८२,९५७

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com