Coronavirus : जिल्ह्यात 30 मृत्यू, 3229 रूग्ण वाढले

जिल्ह्यात 21 हजारांच्या पुढे रुग्णांवर उपचार सुरू
Coronavirus : जिल्ह्यात 30 मृत्यू, 3229 रूग्ण वाढले

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचा कहर सोमवारी कायम होता. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नव्याने 3 हजारांपेक्षा अधिक करोना रुग्ण समोर आले.

यासह मृतांच्या आकडेवारीत 30 ने वाढ झाली. तर पहिल्यांदा उपचार सुरू असणार्‍या रुग्णांच्या संख्यने 21 हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 83.68 टक्क्यापर्यंत खाली आहे.

जिल्ह्यात काल 1 हजार 968 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 16 हजार 610 इतकी झाली आहे. सोमवारी नव्याने 3 हजार 229 नवे करोना रुग्ण सापडले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 21 हजार 136 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 916 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 264 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 174, अकोले 136, जामखेड 26, कर्जत 77, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 59, नेवासा 20, पारनेर 68, पाथर्डी 38, राहाता 67, राहुरी 15, संगमनेर 57, शेवगाव 133, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 11, कँटोन्मेंट बोर्ड 93, मिलिटरी हॉस्पिटल 23, इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 312, अकोले 31, जामखेड 3, कर्जत 17, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 54, नेवासा 31, पारनेर 6, पाथर्डी 8, राहाता 91, राहुरी 23, संगमनेर 185, शेवगाव 11, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 55, कँटोन्मेंट बोर्ड 28 आणि इतर जिल्हा 34 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 1 हजार 264 जण बाधित आढळून आले.

मनपा 256, अकोले 32, जामखेड 16, कर्जत 119, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 142, नेवासा 62, पारनेर 61, पाथर्डी 44, राहाता 49, राहुरी 66, संगमनेर 54, शेवगाव 69 श्रीगोंदा 96, श्रीरामपूर 48, कॅन्टोन्मेंट बोर्ड 5 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे. रविवारी करोना बळींची संख्या 1 हजार 582 होती. त्यात 30 ने वाढ झाल्याने आता करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 1 हजार 612 झाली आहे.

मनपा हद्द 742, संगमनेर 296, नगर ग्रामीण 255, कर्जत 213, शेवगाव 213, राहाता 207, अकोले 199, कोपरगाव 182, पारनेर 135, भिंगार 126, श्रीगाेंंदा 122, श्रीरामपूर 114, नेवासा 113, राहुरी 104, पाथर्डी 90, अन्य जिल्हा 50, जामखेड 45, लष्कर रुग्णालय 23, अन्य राज्य 0 असे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com