Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८४६ रुग्णांची नोंद

Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८४६ रुग्णांची नोंद
करोना अपडेट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात गुरूवारी नव्याने 2 हजार 846 नवे करोना रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील करोनातून बरे होण्याची टक्केवारी 88 टक्क्यांपर्यंत वाढली असली तरी उपचार सुरू असणार्‍या बुधवारच्या आणि गुरूवारच्या रुग्ण संख्येत जिल्हा आरोग्य विभागाकडून घोळ घालण्यात आलेला आहे. बुधवारी 25 हजार 322 उपचार घेणारे रुग्ण दाखविण्यात आले होते.

त्यानंतर गुरूवारी 4 हजारांहून अधिक रुग्ण करोनातून बरे झाल्याचे दाखविण्यात आले असून पुन्हा सायंकाळच्या आकडेवारीत जिल्ह्यात उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 27 हजार 677 दाखविण्यात आलेली आहे. यामुळे करोना संसर्ग खरोखर कमी होतोय की आकडेवारीचा झाले सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात गुरूवारी 4 हजार 136 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 95 हजार 682 इतकी झाली आहे. गुरूवारी नव्याने 2 हजार 846 करोना वाढलेले असतांना उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 27 हजार 677 दाखविण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 495, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 287 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 64 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 27, अकोले 50, जामखेड 83, कर्जत 2, नगर ग्रामीण 23, नेवासा 5, पारनेर 5, पाथर्डी 6, राहता 3, राहुरी 4, संगमनेर 138, शेवगाव 137, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 2, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 160, अकोले 28, जामखेड 4, कर्जत 14, कोपरगाव 54, नगर ग्रामीण 179, नेवासा 98, पारनेर 93, पाथर्डी 94, राहाता 125, राहुरी 45, संगमनेर 101, शेवगाव 109, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 118, कँटोन्मेंट बोर्ड 9, इतर जिल्हा 31 आणि इतर राज्य 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1 हजार 64 जण बाधित आढळुन आले. मनपा 73, अकोले 49, जामखेड 17, कर्जत 57, कोपरगाव 73, नगर ग्रामीण 74, नेवासा 21, पारनेर 60, पाथर्डी 154, राहाता 33, राहुरी 63, संगमनेर 67, शेवगाव 30, श्रीगोंदा 214, श्रीरामपूर 67, कँटोन्मेंट 3 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. यासह बुधवारी करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 2 हजार 401 होती. त्यात वाढ होवून गुरूवारी करोना बळींची संख्या 2 हजार 404 झाली आहे.

संगमनेर 306, नगर ग्रामीण 276, शेवगाव 276, नगर मनपा 260, पाथर्डी 254, श्रीगोंदा 235, श्रीरामपूर 187, राहाता 161, पारनेर 158, अकोले 127, कोपरगाव 127, नेवासा 124, राहुरी 112, जामखेड 104, कर्जत 73, अन्य जिल्हा 46, भिंगार 15, अन्य राज्य 5 आणि लष्कर रुग्णालय शुन्य.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com